शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर नगरपालिकेत संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे सदस्य हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:48 IST

अशोक पाटील।इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जादा असूनही सत्ताधारी विकास आघाडी चे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीचे सभापती आणि नगरसेवक हतबल झाले आहेत. त्यामुळे पालिकेशी सुतराम संबंध नसलेलेही राष्ट्रवादीला भीती दाखवू लागले आहेत.पालिकेशी संबंध नसलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील यांच्याविरुध्द विरोधी विकास आघाडीचे कान भरले. पालिका ...

ठळक मुद्देसत्ताधारी आघाडी वरचढ : आक्रमकताही हरविल्याचे चित्रसत्ताधारी आघाडी वरचढ : आक्रमकताही हरविल्याचे चित्रएका स्वयंघोषित युवा नेत्याची लुडबूड वाढली

अशोक पाटील।इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जादा असूनही सत्ताधारी विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीचे सभापती आणि नगरसेवक हतबल झाले आहेत. त्यामुळे पालिकेशी सुतराम संबंध नसलेलेही राष्ट्रवादीला भीती दाखवू लागले आहेत.पालिकेशी संबंध नसलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील यांच्याविरुध्द विरोधी विकास आघाडीचे कान भरले. पालिका प्रशासनाला हाताशी धरून डॉ. पाटील यांच्या रुग्णालयाची झडती घेतली. यामध्ये ठेकेदाराने ठेवलेली जुनी वीज उपकरणे सापडली. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. परंतु हे प्रकरण कायद्याच्या चाकोरीत बसत नसल्याने, पोलिसांनीच गुन्हा नोंद करण्यास नकार दिला. यावेळी गटनेते संजय कोरे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती, तर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत आक्रमकता दिसली नाही.राष्ट्रवादीतून विकास आघाडीत पाहुणे म्हणून आलेले निशिकांत पाटील पालिकेत कारभारी होऊन बसले आहेत, पण विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांची नाराजी प्रकर्षाने जाणवते. ते नाराजीतूनच पालिकेतील कारभार हाकत आहेत. त्यांच्यासाठी खास बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे. परंतु त्यांचे तेथील दर्शन दुर्मिळ झाले आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधी गटातील दादासाहेब पाटील यांना उपनगराध्यक्षाचा मान दिला आणि इस्लामपूर पालिकेत आमचीच सत्ता आली, म्हणून टिमकी वाजवली. परंतु लोकनियुक्त नगराध्यक्षांपुढे राष्ट्रवादीची डाळ शिजत नाही. गेल्या नऊ महिन्यातील सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी राष्ट्रवादीची कार्यपद्धत दिसली आहे. सभागृहावर पकड आणण्यासाठी नगराध्यक्ष पाटील विरोधकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार देत आहेत. तो राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहन करत आहेत. सभागृहात मूग गिळून गप्प बसायचे आणि बाहेर बोलबच्चनगिरी करायची, ही राष्ट्रवादीची कार्यपद्धत अंगलट येऊ लागली आहे. याचाच फायदा पालिकेशी संबंध नसलेले कार्यकर्ते उठवू लागले आहेत. सध्या शहरात सुरू असलेली किरकोळ विकासकामे म्हणजे ‘जुन्या भांडवलावर व्याज खाणे’ असा प्रकार आहे. त्यामध्येही सत्ताधारी आणि विरोधकांत तू-तू मै-मै सुरू आहे.स्वयंघोषित युवा नेत्याची लुडबूडपालिकेत विकास आघाडीच्या नगरसेवकांचे बगलबच्चे यांची चलती आहे. बहुतांशी नगरसेवकांचे बगलबच्चेच पालिका वर्तुळात वावरताना दिसतात. पालिका प्रशासनाच्या कारभारात सध्या एका स्वयंघोषित युवा नेत्याची लुडबूड वाढली आहे. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक न्यायालयाच्या माध्यमातून अद्दल घडविण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस